- एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प–डहाणू
एकात्मिक बालविकास सेवा योजना डहाणू हा 1983 पासून कार्यान्वीत असुन त्यात 389मेन अशी अंगणवाडी केंद्र समाविष्ट आहेत. सन 2024-2025 अंतर्गत प्रकल्पातील 3138 गरोदर व स्तनदा मातांना, 15783सहा महिने तेसहा वर्षे वयोगटातील मुलांना आहाराचा लाभ देणेत आलेला आहे. डॉ ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार अंतर्गत गरोदर व स्तनदामाता यांना एकवेळचा चौरस आहार देण्यात येतो, तसेच अमृत आहार योजने अंतर्गत 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना अंडी / केळी आठवडयातुन चार वेळा आहार देण्यात येतो. गरोदर माता व स्तनदा माता तसेच 0 ते 6 वर्षाच्या मुलांची आरोग्य तपासणी राष्ट्रीय बालस्वास्थ योजने अंतर्गत तपासणी करण्यात येते, त्यातआढळून आलेल्या5 सॅम बालकांची EDNF द्यवारे ग्राम बाल विकास केंद्र कार्यान्वीत करण्यात येउन त्यांना त्यात दाखल करण्यात आलेली आहे. तसेच 118मॅम बालकांची ARF बेस ग्राम बाल विकास केंद्र कार्यान्वीत करण्यात येउन त्यांना त्यात दाखल करण्यात आलेली आहे
- एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प -कासा
एकात्मिक बालविकास सेवा योजना कासा हा 26 जानेवारी 2008 रोजी पासून डहाणू तालुक्यात नव्याने सुरू झाला असून त्यात 00 मुळ अंगणवाडी केंद्र व 233 मिनी अंगणवाडी केंद्र अशा एकूण 233 अंगणवाडी केंद्र समाविष्ट आहेत.अंगणवाडी सेविका 05,मदतनिस 86,मिनि अंगणवाडी सेविका 00 एवढी पदे रिक्त आहेत.
सन 2024-25 प्रकल्पातील 1304 गरेादर महीला व स्तनदामाता 1479 किशोरवयीन मुली 00 सहा महीने ते सहा वयोगटातील मुलांना पुरक पोषण आहार अंतर्गत गरोदर व स्तनदान मातांना कंच्चे धान्य ,अंडी, भाजीपाला तसेच टंपपा 2 अंतर्गत 7 महीने ते 6 वर्ष वयोगटातील 14443 लाभार्ष्यांना अंडी व पुरक पोषण आहार घरपोच देण्यात आलेले आहेत. आहार वाटपाचे काम 84.36% झालेले आहे.
0 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व बालकांचे दरमहा वजन मापन सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच दरमहा आढळलेल्या सॅम व मॅम बालकांना बालविकास केंद्रात दाखल करुन EDNF देवून श्रेणी वर्धन करणेत आलेले आहे. पोषण अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम घेवून संतुलीत आहार व स्वच्छता विषयी गाव पातळीवर जनजागृती करणेत आली आहे.
सन 2024-25 सालामध्ये महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यांत आलेल्या निरनिराळया योजनांचे खालील प्रमाणे वाटप करणेत आलेले आहे.