परिचय
डहाणू हा पालघर जिल्हयातील एक आदिवासी बहुल तालुका आहे. तसेच डहाणू तालुका हा मुख्यत्वे डोंगरी व सागरी भागात वसलेला आहे. डहाणू तालुक्याचे क्षेत्रफळ 980.50 चौ.की.मी. असून एकूण लोकसंख्या 402095 आहे. डहाणू तालुक्याच्या उत्तरेस तलासरी तालुका व गुजरात राज्याची सीमा, दक्षिणेस पालघर तालुका, पुर्वेस जव्हार व विक्रमगड तालुका व पश्चिमेस अरबी समुद्र आहे. डहाणू तालुक्याची रचना ही पुर्वेस डोंगराळ व आदिवासी भाग विखुरलेला असून पश्चिमेस समुद्रकिनारपट्टी आहे. तालुक्यातुन मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र[…]